Posts

Showing posts from March, 2018

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

#जागतिक_महिला_दिनानिमित्त

#माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...

"माझी आई"

आजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…