Posts

Showing posts from February, 2019

चांदणस्पर्श

Image
चांदणस्पर्श..! दिवेलागणीला मागचं दार उघडून ग्यालरीत आले आणी समोरच चंद्र झाडाआड लपलेला दिसला. अगदी शांत, शीतल चांदणं...., अलगद थंड  वाऱ्याची झुळूक आली.., आणी मनात कुठल्याशा गाण्याची शोधाशोध सुरु झाली. पण कुठलं गाणं...??,,, अगदी बराच वेळ आठवेना ते गाणं. असं मुद्दाम काहीतरी आठवायला गेलं कि मेंदू आडग्यासारखा रुसुनच बसतो. घरातून अंगणात येरझाऱ्या घालून सुद्धा गाण्याची एकही ओळ लक्षात येईना. आत्ता हल्लीच तर ऐकलेलं...कितीदा त्यातल्या ओळी गुणगुणत होते...."चांदणं....Ss..अंगणी..Ss" ईतकंच आठवे पण पुढचं, मागचं सपाट.... असं काही माहिती असलेलं ऐनवेळेस आठवेना कि ते आठवेस्तोवर चैन पडत नाही हे मात्र खरं. नेहमीची कामं हातावेगळी करत करत मेंदूच्या आठवण कप्प्यात गाण्याचा शोध सुरु ठेवलेला. कंप्युटर बॅकअप मधे सर्च सुरु ठेवल्यावर कसा तो डिटेक्टिव्ह भिंग (microscope)प्रत्येक कप्प्यातल्या पुस्तकांवर गोल गोल फिरुन शोधून काढतो तसंच काहीतरी  माझ्या मेंदूत सुरु असावं वाटलं. शेवटी आमच्या डोक्यातल्या गुप्तचर सूक्ष्मदर्शकाने ते गाणं शोधलंच. स्वयंपाक घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर आता