Posts

Showing posts from 2020

गंपुल्या_गोष्टी_खोडकर_गंपू

#गंपुल्या_गोष्टी_खोडकर_गंपू युग मोठा होतोय तसतसा अधिकच रंजक आणी खोडकर प्राणी होत चाललाय. हल्ली रोजचा एक किस्सा असतो त्याच्या उशीचा. त्याला त्याच्या उशीवर चुकून आमचा हात पडलेला, डोकं आलेलं दिसलं की सगळी शक्ती पणाला लावतो आणी त्याच्या उशीवरुन ढकलून बाजूला करतो. त्याचा पप्पा त्याच्या वरचढ, मुद्दाम त्याच्या उशीकडे सरकत जाऊन उशीचा कोपरा पकडेल आणी त्याला छळेल., की हा अजून खवळतो. रोज रात्री झोपताना दोघांची भांडणं. ह्याचा अगदीच नाईलाज झाला की रडारड सुरु.."अडे हा माझा जागाये..ते माझी उशी हाय...तू जा तिकडे.." करुन ऊशीच्या दोन्ही बाजूला हात ठेवून जागा अडवतो. किमान पंधरा-वीसमिनिटं हे नेहमीच असतं. मग पेंगुळला की कुठली उशी कुठलं काय.. एका बेडशीट सेटवर दोन सारखे उशीकव्हर येतात. ते दोन्ही आम्हा नवराबायको च्या उशांना लावते. आणी युग च्या उशीसाठी वेगळं फुलांच,पण बेडशीट कलरशी मिळतं-जुळतं कव्हर घालते. तर त्याला उगाच त्याची उशी स्पेशल-बिशल वाटते. सोबतीला त्याची म्याऊ-चादर,आणी सगळ्यात छोटा टेडी त्याचाच बेबी म्हणून उशीवर असतो.  पण रात्री झोपेत, ना उशीचं ध्यान असतं ना चादरीचं. मग पप्पांनी कुशी
#लॉकडाऊन_आठवणी आज सकाळपासून ईथे कोणी शाळेचं मैदान साफ करत होते. परवा फणस उतरवले. पोपट कावले होते, त्यांचे फणस नेले म्हणून. गेल्यावर्षी फणस झाडावरच पिकले तर त्यांची मज्जा झाली. खूप सारे पोपट आले होते तेव्हा. आमच्या बाल्कनीत समोरच शाळेचा आंबा आहे. गेल्यावर्षी खूप कैऱ्या लागलेल्या. यावर्षी एकही नाही. नाहीतर कैऱ्या आणी फणसाच्या वासाने सकाळीच वानरसेना यायची. माझ्या कुंड्या ची नासधूस केलेली एकदा. घाबरून आता ग्रील लावून घेतली ईथे. नकळत माझ्या गोऱ्या मंकीला उचलून नेतील त्यांच्या कळपात म्हणून. तर या वर्षी कैरी लागलीच नाही. आणी फणसही लवकर उतरवले. वानर नाही येणार बहुतेक. एका बाजूला नारळ आहेत ऊंचावर, कधी गळून पडतात कळतच नाही. तीन महिने शाळा ही बंद होती. शाळा सुटली की धुळधुळ ह्वायची बाल्कनीत. आणी ती सकाळी परेड करताना एक धुरळा नुसता. त्यातल्या त्यात ईटुकल्या पोरांचे स्पोर्ट्स भारी असतात बघायला. काहींच बाळसं सुटलेलं नसतं. पळण्याचा कार्यक्रम चाल्लेला, त्यातलाच एक गठल्या ईकडून तिकडे पळेस्तोवर गाणं संपायचं. बाकीचे पळून पोहोचले नी परतीच्या मार्गाने फिरुन आले तरी हा गुटुगुटु करत पोहोचायचा. मग मधेच
#धरिला_पंढरीचा_चोरं... माझा आवडता अभंग युग अगदी लहान असताना... सतत ऐकू-गाऊ वाटायचा. हा अभंग लहानपणी वाचला तेव्हा विठ्ठलही एका लहान मुलासारखा अवखळ असेल वाटला. आईपुढे दुडुदुडु रांगत पळणारा, मधेच तिच्या नजरेआड होऊन लपणारा. अत्यंत लाघवी, निरागस असा,आपल्या हळव्या मनाच्या आईला गोड छळणारा. तिचं चित्त चोरणारा लबाड चोर लपून बसलेला तिला सापडतो आणी कोण आनंद होतो हे त्या माऊलीलाच ठाऊक. जनाईलाही ज्याला वात्सल्य भावनेने आपल्या ह्रदयात बांधून ठेवण्याचा मोह होतो असा बाळ वाटायचा हा विठ्ठल. "तू माझाच आहेस नं..?आणी मीही तूझीच फक्त..?मग मला सोडून कुठे ही जायचं नाही" असा लाडिक हट्ट करणारी माऊली जनाईत दिसली. शब्दांची बेडी पायात अडकवून या भगवंतालाच कैदेत ठेवण्याचा तिचा अट्टाहास. आणी तिच्या ह्या भक्तीपुढे काकुळतीला आलेला विठ्ठल. फार छान वर्णन भक्त आणी देवाच्या नात्यातलं. माझ्या मनाने मला या अभंगाचा बोध हा असाच करवून दिलेला. आता हे असे का हे मलाही नाही माहीत. एक मात्र विशेष आहे, ज्या विठ्ठलाच्या मुर्तीला मी प्रत्यक्षात कधी कुठल्या मंदिरात जाऊन पाहिलं नाही की पूजलं नाही.फार फार तर चित्रात,फोट

#गंपूल्या_गोष्टी #स्वरमयी_गंपू

#गंपूल्या_गोष्टी #स्वरमयी_गंपू कोमल हातांच्या हलक्याफुलक्या टाळ्या., कानात गुदगुल्या करणारी पुसटशी चुटकी नी तोंडातल्या तोंडात केलेलं "शू$$क्...शू$$क....                     आणी                                                          ईतकं सगळं करुनही गॅलरीतून ते पिजन-पिजनी उडेनात म्हणून पसरलेलं भोकाड😭😭 याला विनोदाभास म्हणावं की विरोधाभास...?😅 त्यादिवशी युग मोठ्या टेचात पप्पांना चुटकी वाजवून दाखवावी म्हणून त्यांच्याकडे गेला. "पप्पा ह्यं...बग...चुक्की.."म्हणत अंगठा दोन बोटांवर घासून हलकासा 'फिस्स्' आवाज केला. पप्पाने पुन्हा-पुन्हा कान लावून ऐकला...तरीही 'फिस्...आणी फुस् च'..! "अरे ही कसली चुटकी ही तर फुस्सकी.!." पप्पाच्या बोलण्यावर त्यांच्या सोबत तोही खदाखदा हसला. असं कोणी त्याच्यावर हसलं.., की मी नक्कीच काहीतरी भारी केलं असणार., वाटून तोही आपला खळखळून हसून घेतो.....निव्वळ निरागसता! असाच एकदा शिट्टी वाजवायचा क्लास झाला घरी, पप्पांसोबतच. दोन्ही हातांची बट्टी वाली बोटं तोंडात ठेवून येणारी चिंचोळी शिट्टी..! पप्पा पेक्षाही भारीच जमली त्

#गंपूल्या_गोष्टी #यम्मीटेश्टीगंपू

Image
#गंपूल्या_गोष्टी #यम्मीटेश्टीगंपू परवा मोबाईल वर एकसे बढकर एक रेसिपीज स्क्रोल करुन बघत होते. गंपू मला चिकटून बसून माझ्या मोबाईलमध्ये डोकावत होता.. मग त्यात केक,आईस्क्रीम,चीझी-बटरी फुड असलं काहीही दिसलं की हा "स्स्सीपप...(असा आवाज काढून) वॉव...यम्मीटेश्टी.." म्हणत मोबाईल मधला तो केक हाताने उचलून तोंडात टाकायचा. तसंही आमच्या जेरीला बेरी,दूध-तूप,खवा, साखर,आणी जे काही क्रिमी-बटरी, गोडगोड मोडमध्ये येतं ते सगळंच आवडतं.   हा गोड-मोड माझ्याकडचा आलाय त्याच्यात... मी पण अशीच गोडघाशी होते. त्यातल्या त्यात लहानपणी तूप-साखर चपाती हे माझं फेव्हरेट खाद्य. आई म्हणायची तीला बाळ झालेलं (आमचा धाकटा होता त्यावेळी) म्हणून ती माहेरी होती. आज्जी तिला ताटात असंच भरपूर तूप वगैरे घालून वरणभात, तूप-साखर चपाती द्यायची. आणी मला वेगळी प्लेट देऊन बाजूला बसवायची. मी मात्र आईच्या ताटात तूप-साखर जास्तय म्हणून तिच्याच ताटात जेवायचा हट्ट करायची. आजीने मला कितीही तूप वाढलं तरी "तू आईलाच जास्त देतेस" म्हणायचे. काल गंपू साठी केक केला... साहित्य तोकडं होतं पण त्याच्यासाठी करायचाच म्हणून जुळवाजु

कोरोना सुट्टीतलं विशेष वाळवण

Image
Feeling लॉकडाऊन झटके🙄 #जिभेचे_चोचले_कित्ती_कित्ती_कित्ती_ते_पुरवावे कोरोना सुट्टीतलं विशेष वाळवण..... साहित्य: भाजीवाल्याकडे मिळेल तो भाजीपाला, घरचंच मीठ, पाणी .... कृती: भाजीपाला जो मिळेल तो घेऊन आलात की आधी ती पिशवी योग्य त्या ठिकाणी ठेवून प्रथम हात स्वच्छ साबणाने धुवून घ्या.(हि स्टेप फारफार महत्वाची आहे.) भाज्या मोठाल्या पराती,टोपांमध्ये काढून घ्या. त्यात पाणी भरून भाजी ला यथेच्छ स्विमिंग करुद्या. हात पुन्हा एकदा धुवून या.(अर्थातच तुम्ही आता सवयीचे गुलाम झालेले आहात)  पळीभर,पसाभर,मुठभर असं जे काही अव्हेलेबल असेल ते प्रमाण घेऊन मीठ सगळ्यां भाज्यांना पुरेल असे प्रत्येक भांड्यात टाकत सुटा..आता त्या भाज्याना समूद्रात स्विमिंग करत असल्याचं फिल येऊद्या. जिवाची मज्जा मज्जा करु द्या जरा त्यांनाही.. दहा मिनिटांनी त्या मिठाळ पाण्यातून भाज्या निथळून काढा. आता फक्त आणखी एकदा., साध्या पाण्यात त्यांना डुबकी मारायची संधी द्या.... मग पहा कसं रुप खुलुन येईल त्यांचं..  आता म्हणा त्यांना "झाला नं शंभो करून.??, चला निघा बरं बाहेर....नाहीतर सर्दी होईल" आणी मोकळ्या पराती, ट

#A_dream_of_corona #माझ्या_स्वप्नातली_कोरोना

Image
#A_dream_of_corona #माझ्या_स्वप्नातली_कोरोना ही स्वप्नात आली होती काल रात्री....कोरोना कीटकीन म्हणून. स्वप्न दोन पार्ट मध्ये पडलं तसंच लिहिते. 1st part  माझ्या स्वप्नात आलेल्या टिव्हीत बातम्या चालू होत्या. नुकत्याच कळलेल्या धक्कादायक बातमी ... कोरोना हा विषाणू नसून. ती एक स्री-कीटक असल्याचे समजले. जिचं डिझाईन ते गोल-गोल काटेरी चेंडू सारखं नसून आता असं ह्या काटेरी की केसाळ किडीसारखं दाखवलं जात होतं. *(कालच समोरच्या झाडावर पाहिली म्हणून दिसली असेल स्वप्नात)*. ही कीटकीन जिथे जिथे जाईल तिथे तिथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. त्यामुळे तुम्हाला आजुबाजुला कुठेही ही दिसली तर लगेच फोन करून अमुक नंबरवर कळवा असे सांगितले जात होते. आत्तापर्यंत जो विषाणू होता तो अचानक कीटकीन असल्याचे कळल्यावर सगळ्या चँनेलवर ह्याच बातम्या. व्हॉट्सऍप वर मँसेजस फिरत होते. एका ग्रुपवर चाल्लेलं संभाषण.. मेंबर A: "खरंय मित्रांनो पुराणकाळात महाभारत घडण्यासाठीही एक स्त्रीच कारणीभूत ठरते. आता ही महामारी घडवून आणण्यासाठी ही एक स्री कीटकच जन्माला आलीय. अख्खं जग गिळल्याशिवाय काय ही शांत होत नाय.."😣

#गंपूल्या_गोष्टी_डेंजर_डिक्शनरी

                #गंपूल्या_गोष्टी #लबाड_गंपू #डेंजर_डिक्शनरी "अडे आई ऊठ चेअर पप्पाचीये".... ."आबा ऊठ चेअर पप्पाचीये".....करून आम्हाला कायम हुसकावून लावतो. आणी स्वतःजाऊन ऐटीत बसतो. घुसखोर कुठला... आमच्या सेल्फीतही ह्याची घुसखोरी ठरलेली... संध्याकाळी जेव्हा पप्पा खुर्चीवर बसायला जातात तेव्हाही "अडे पप्पा शडक ना" म्हणत खुर्चीत जागा मटकावतो. नाहीतर मग पप्पा घरी आले की हात-पाय धुवून येईस्तोवर हाच घाईघाईने चेअरवर जाऊन बसतो. खुर्चीत लबाडी करून बसून फर्मान सोडायचं "नाईनयच्छम(9xm channel) लाव", बिशिट दे, "आई...अअं....कुडुम पापड देते?"...आईने डेंजर लूक दिला की मग स्वतःच  "थांबा थांबा देते हां...(हा माझा डायलॉग पाठ केलाय त्याने)" म्हणत आत जाऊन डब्यात खुडबुडणार..... त्यादिवशी पप्पांना म्हणाला... "पप्पा झिम्ब्डाटी...लाव....आण्णा आले.." पप्पाला कळेना....तर पुन्हा म्हणाला "अडे झिम्ब्डाटी लाव ना" पप्पांना नाहीच कळाले.... मला कळले काय म्हणतोय ते., पण मी आतून मज्जा घेत होते....गंपू चिडून पप्पाशी भांडणार ईतक्य

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी

Image
#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी साहित्य:- एकजुडी पालक धुवून चिरलेला एक वाटी मेथीची पाने एक वाटी शिजवलेली तुरीची डाळ एक चमचा बेसन दोन-तीन चमचे चिंचेचा कोळ एक चमचा गुळ एक चमचा तेल फोडणीसाठी तेल दोन पळी एक चमचा मोहरी लसूण दहा-पंधरा पाकळ्या बारीक चिरलेला एक मुठभर शेंगदाणे चवीनुसार मीठ लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर कृति :- एका भांड्यात चमचाभर तेल घालून त्यात पालक आणी मेथी परतून घ्या. वरुन तुरीची डाळ, चिंचेचा कोळ घालून सर्व एकजीव करून घ्या. आता बेसन आणी गुळ घालून पुन्हा ढवळून घ्या. मंद आचेवर पाच-सात मिनिटे शिजू द्या. तोवर ईकडे फोडणीची तयारी करायला घ्या. एका भांड्यात दोन पळ्या तेल घेऊन गरम करा. त्यात मोहरी टाकून तडतडली की मंद आचेवर चिरलेला लसूण घालून लगेच शेंगदाणे टाकून परतून घ्या. वरुन चवीनुसार मीठ घातले की लसूण आणी शेंगदाणे ही छान कुरकुरीत होतील. आता ग्यास बंद करून त्या फोडणीत वरुन हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर घालून फोडणी एकत्र ढवळून घ्या. आता ही फोडणी गरम गरम भाजीवर चमच्याने वरुन हळूहळू ओता. फोडणी संपूर्ण भाजीवर पसरेल अशीच हळूहळू टाकावी. जेणेकरून लसूण-शेंगदाणे