#गंपूल्या_गोष्टी_डेंजर_डिक्शनरी

               

#गंपूल्या_गोष्टी
#लबाड_गंपू
#डेंजर_डिक्शनरी



"अडे आई ऊठ चेअर पप्पाचीये"....
."आबा ऊठ चेअर पप्पाचीये".....करून आम्हाला कायम हुसकावून लावतो. आणी स्वतःजाऊन ऐटीत बसतो.
घुसखोर कुठला... आमच्या सेल्फीतही ह्याची घुसखोरी ठरलेली...

संध्याकाळी जेव्हा पप्पा खुर्चीवर बसायला जातात तेव्हाही "अडे पप्पा शडक ना" म्हणत खुर्चीत जागा मटकावतो. नाहीतर मग पप्पा घरी आले की हात-पाय धुवून येईस्तोवर हाच घाईघाईने चेअरवर जाऊन बसतो.

खुर्चीत लबाडी करून बसून फर्मान सोडायचं "नाईनयच्छम(9xm channel) लाव", बिशिट दे, "आई...अअं....कुडुम पापड देते?"...आईने डेंजर लूक दिला की मग स्वतःच  "थांबा थांबा देते हां...(हा माझा डायलॉग पाठ केलाय त्याने)" म्हणत आत जाऊन डब्यात खुडबुडणार.....

त्यादिवशी पप्पांना म्हणाला... "पप्पा झिम्ब्डाटी...लाव....आण्णा आले.." पप्पाला कळेना....तर पुन्हा म्हणाला "अडे झिम्ब्डाटी लाव ना" पप्पांना नाहीच कळाले.... मला कळले काय म्हणतोय ते., पण मी आतून मज्जा घेत होते....गंपू चिडून पप्पाशी भांडणार ईतक्यात मीच म्हटलं  "झी मराठी लावा., रात्रीस खेळ बघायचंय"  पप्पा हसून हसून फुटले....तशी ह्याची डिक्शनरी डेंजर आहे...मॉचकायजर लाव, गुमॉन्नींग, गुन्नाईट,चला भू जायचं, झुझुकगाडी, नोंतर(नंतर), वॉचिंगबचींग(वॉशिंग मशीन), जेबाचं(जेवायचं), ढोंशाचट्टी (डोसा-चटणी),वोडण(वरण),गडम, ठण्णं, बोईशेप(बडीशेप).....आणी बरंच काय काय...

#@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬