#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी


#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी




साहित्य:-

एकजुडी पालक धुवून चिरलेला
एक वाटी मेथीची पाने
एक वाटी शिजवलेली तुरीची डाळ
एक चमचा बेसन
दोन-तीन चमचे चिंचेचा कोळ
एक चमचा गुळ
एक चमचा तेल

फोडणीसाठी
तेल दोन पळी
एक चमचा मोहरी
लसूण दहा-पंधरा पाकळ्या बारीक चिरलेला
एक मुठभर शेंगदाणे
चवीनुसार मीठ
लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर

कृति :-
एका भांड्यात चमचाभर तेल घालून त्यात पालक आणी मेथी परतून घ्या. वरुन तुरीची डाळ, चिंचेचा कोळ घालून सर्व एकजीव करून घ्या. आता बेसन आणी गुळ घालून पुन्हा ढवळून घ्या. मंद आचेवर पाच-सात मिनिटे शिजू द्या. तोवर ईकडे फोडणीची तयारी करायला घ्या.

एका भांड्यात दोन पळ्या तेल घेऊन गरम करा. त्यात मोहरी टाकून तडतडली की मंद आचेवर चिरलेला लसूण घालून लगेच शेंगदाणे टाकून परतून घ्या. वरुन चवीनुसार मीठ घातले की लसूण आणी शेंगदाणे ही छान कुरकुरीत होतील. आता ग्यास बंद करून त्या फोडणीत वरुन हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर घालून फोडणी एकत्र ढवळून घ्या. आता ही फोडणी गरम गरम भाजीवर चमच्याने वरुन हळूहळू ओता. फोडणी संपूर्ण भाजीवर पसरेल अशीच हळूहळू टाकावी. जेणेकरून लसूण-शेंगदाणे प्रत्येक घासाला तोंडात येतील.

😊 झाली तयार मुद्दा भाजी. सोबत गरमागरम भाकरी, पराठा,वाफाळता भात काहीही घ्या.😋
✍️@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

लिमलेट-अंकल..🍬🍬

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या