Posts

Showing posts from March, 2019

#मी_झाड_असते_तर..??

Image
#मी_झाड_असते_तर..?? कलिंगड खाताना बी गिळली की पोटात झाड उगवतं..... ह्याची भयंकर भीती तेव्हा अनुभवली जेव्हा हा किस्सा घडला... मी शाळेत तिसरी-चौथीला असेन. उन्हाळी सुट्टी सुरु झालेली. पप्पांनी आणलेलं कलिंगड त्या दिवशी दुपारी खाल्लं आणी मी खेळायला मागच्या गल्लीत गेले.  ते खाल्या नंतर संध्याकाळी दोन्ही कानात खूप खाज यायला लागलेली. घसा खवखवत होता. ही खरंतर सर्दी-खोकला होण्याची लक्षणं. पण मैत्रिणीने अचानक विचारलं "तू कलिंगडाची बी गिळलेलीस का...? गिळली असशील तर मेलीसच बघ...तुझ्या पोटात आता कलिंगडाचं झाड उगवणार...कानातून, नाकातून, तोंडातून फांद्या बाहेर येणार."  या डेंजर माहिती वर तिथेच खेळत असलेल्या बाकीच्या तीन-चार जनांनी पण शिक्कामोर्तब केलं. मस्त  घाबरगुंडी उडाली. मला उगाच मी बी गिळलीये असंच वाटायला लागलं. आमच्यातलंच कुणीतरी म्हणालं " अगं जा आईला सांग लवकर, डॉक्टरकडे जा...ते पोट कापून लग्गेच बी काढून टाकतील.." हे ऐकून तर पोटात मोठ्ठा गोळाच आला. आईला सांगितलं तर ती डॉक्टर कडे नेऊन माझं पोट कापायला लावेल. म्हणून तिला सांगणं तर मी तेव्हाच कँसल केलेलं. पण नाही स