गंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड
गंपू वय १४ महिने माझ्या घराला आता शांततेची सवय अजिबात नाही राहिलेली. दिवसभर युगचा दंगाच सुरु असतो नुसता. आणी जरा कुठे शांत शांत झालंच तर समजून जायचं हा गंप्या काहीतरी उचापती करतोय. आता तर काय उठसूट टपातल्या पाण्यातच जाऊन बसतो खेळत. आणी मग मी त्याला विचारलं "अरे तू काय Hippopotamus आहेस का ?" तर हा आपला हसतच सुटतो. काय अप्रूप वाटतं त्याला या 'हिप्पोपोटमसचं'!, बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला! म्हणजे मला खरंतर रागवायचं असतं त्याच्या या पाणी उद्योगावर पण मी ते विसरुन त्याच्या हसऱ्या, गोबऱ्या-गालांवर आलेली चकाकी आणी त्यात मध्यभागी क्वचितच दिसणारी खळी यातच हरवते. खळखळून हसल्यावर डोळ्यांत आलेले थेंबभर आनंदाश्रू आणी त्या थेंबभर पाण्यामुळे चमकणारे डोळे बघतच रहावे. हि लहान मुलं हसतातच इतकी गोड ना की आपण विरघळतोच. 'हिप्पोपोटमस' हा शब्द त्याने टिव्हीवर एका लहान मुलांच्या जाहिरातीत ऐकला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ऐकला तो खळखळून हसलाय. हो त्याला जाहिरातींच भयंकर वेड. कृष्