Posts

चांदणस्पर्श

Image
चांदणस्पर्श..!


दिवेलागणीला मागचं दार उघडून ग्यालरीत आले आणी समोरच चंद्र झाडाआड लपलेला दिसला. अगदी शांत, शीतल चांदणं....,
अलगद थंड  वाऱ्याची झुळूक आली.., आणी मनात कुठल्याशा गाण्याची शोधाशोध सुरु झाली.
पण कुठलं गाणं...??,,, अगदी बराच वेळ आठवेना ते गाणं. असं मुद्दाम काहीतरी आठवायला गेलं कि मेंदू आडग्यासारखा रुसुनच बसतो.

घरातून अंगणात येरझाऱ्या घालून सुद्धा गाण्याची एकही ओळ लक्षात येईना. आत्ता हल्लीच तर ऐकलेलं...कितीदा त्यातल्या ओळी गुणगुणत होते...."चांदणं....Ss..अंगणी..Ss" ईतकंच आठवे पण पुढचं, मागचं सपाट....

असं काही माहिती असलेलं ऐनवेळेस आठवेना कि ते आठवेस्तोवर चैन पडत नाही हे मात्र खरं. नेहमीची कामं हातावेगळी करत करत मेंदूच्या आठवण कप्प्यात गाण्याचा शोध सुरु ठेवलेला. कंप्युटर बॅकअप मधे सर्च सुरु ठेवल्यावर कसा तो डिटेक्टिव्ह भिंग (microscope)प्रत्येक कप्प्यातल्या पुस्तकांवर गोल गोल फिरुन शोधून काढतो तसंच काहीतरी  माझ्या मेंदूत सुरु असावं वाटलं. शेवटी आमच्या डोक्यातल्या गुप्तचर सूक्ष्मदर्शकाने ते गाणं शोधलंच.

स्वयंपाक घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर आता चंद्रच दिसेना…

#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे....

#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे....
दरवेळी गावाकडून येताना फुलझाडं, बिया वगैरे आणते. कालपण गुलाबाची फांदी घ्यायला विसरेन म्हणून सकाळीच  उजडत हातात विळा घेऊन काकीच्या परड्यात गेले. गुलाबासोबत मोगरापण घेतला छाटून. गुलाबाने हाताला खरचटलं. भाऊ मला वेडी म्हणाला. "मुंबईत मिळत नाहीत का गुलाबाची झाडं ? एवढा आटापिटा करुन ईथून नेतेय" म्हटला.

ईथल्या गुलाबाला तो गावठी गुलाबाचा सुगंध येईना म्हणून तिकडूनच फांदी आणून लावायचा माझा हट्ट. मैत्रीण तर म्हणे "खोटी फुलं आणायची सजावट करायला., ती सुकतसुद्धा नाहीत., कशाला ईतकी मेहनत घेतेस..?" 
मला कसंसंच वाटतं ते. छान हिरवागार जरीकाठ शालू नेसणारीला हिरव्या पॉलिस्टरमध्ये गुंडाळल्यासारखं. छ्या्.! नुसतीच बनावटी शोभा. आई म्हणायची "घराभोवती चार फुलझाडं असलीत की घरातल्या हवेचा, वातावरणाचा पोत सुधारतो." पटतं मला ते.

अहोंनी लग्नानंतर फिरायला कुठे जायचं विचारलं तेव्हा ही मी जिथे मस्त हिरवागार परिसर, शुद्ध मोकळी हवा असेल तिकडे न्या म्हटलं. तेव्हाही केरळ डोळ्यांत साठवून घेतलं. गावी आल्यावर सुद्धा तेच करते. वर्षभरासाठी ती हिरवळ, स्वच्छ नितळ वातावर…

Asmi Shinde💁: नावात काय आहे...??

Asmi Shinde💁: नावात काय आहे...??

खूप साऱ्या आठवणी...???
लहानपणापासून आत्तापर्यंत खूप नावांनी मला हाक मारणारी वेगवेगळी लोकं माझ्या आयुष्यात आलीत...सर्वांत पहिलं नाव जे आई-पप्पांनी दिलं.....'प्रमोदिनी'.!

हे फार कोणाला नाही माहित पण माझं सर्वात पहिलं नाव हेच. अर्थात मलाही खूप वर्षांनी कळलं. कारण तोवर फक्त 'रुपाली'याच नावाने मी स्वतःला ओळखत होते. आईने सांगितलं प्रमोदिनीचं टोपणनाव 'पमे','पमा' झालं असतं म्हणून तिने माझं नाव बदलून रुपाली असं ठेवलं. माझी बहिण दिपाली आणी मी रुपाली. असं काहिसं ते ठरलं. मग पुढे त्याचं टोपण 'रुपा' झालं. ठिकेय..! पमे पेक्षा बरंच वाटतं ते.

पुढे शाळेतल्या चिडवा-चिडवीत रुपाचं 'पारु'...रुपाली चं 'पाली' 'लीपारु' वगैरे वगैरे झालं. आणी मला माझ्या नावाचा राग यायला लागला.
एकदा गावी कोणीतरी मला विचारले "तू मंबयीच्या नंदूनानांची रुपी ना गं..??"🙄. आणी मला माझ्या नावाच्या आणखी एका रुपाचा साक्षात्कार झाला. तेव्हा "पारु गं पारु...." गाणं दर गणपतीत स्पीकरवर लावलं जायचं. आणी मी अजिबात न ऐकल्याचं…

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

#जागतिक_महिला_दिनानिमित्त

#माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...

"माझी आई"

आजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…

माझी खवय्येगिरी - मसालेदार शाही खजाना/Shahi chat

Image
#मसालेदार_शाही_खजाना/Shahi chat
*Ingredients
1 bowl corn,
2 tbsp small pieces of paneer,
2 tbsp small pieces of Simla mirch,
5-6 Badam,
5-6 kaju,
1 tbsp kishmish,/manuka,
2 tbsp chopped pineapple,
2 tbsp oil
*Spices as per your taste Chilly powder,
Aamchur powder,
Salt & crushed sugar
*How to make Receipe Take 2tbsp oil in a kadhai  and fry kaju,Badam, kishmish alltogether and keep aside. Then fry paneer in same oil & keep aside. Lastly add corns and roast them 2 minutes on low flame Now add chopped Simla & chopped pineapple  saute for a minute and switch of the gas. Add all the Spices, sugar and the fried ingredients together. mix well & Serve hot this spicy, juicy shahi chat😋😋
Enjoy This winter with my lovely recipe 😋😘
@$m!

सेलिब्रेशन

💁 सेलिब्रेशन

आज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा.

"खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाडी ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली.

 रात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही  बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण  सकाळीच झाली.

सकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज.

 मग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई स्वयंपाक…

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

Image
युग(गंपू)
२० महिनेलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते! अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो.  असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.

मी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…