#गंपूल्या_गोष्टी #स्वरमयी_गंपू

#गंपूल्या_गोष्टी
#स्वरमयी_गंपू

कोमल हातांच्या हलक्याफुलक्या टाळ्या., कानात गुदगुल्या करणारी पुसटशी चुटकी नी तोंडातल्या तोंडात केलेलं "शू$$क्...शू$$क....                     आणी                                                         
ईतकं सगळं करुनही गॅलरीतून ते पिजन-पिजनी उडेनात म्हणून पसरलेलं भोकाड😭😭 याला विनोदाभास म्हणावं की विरोधाभास...?😅

त्यादिवशी युग मोठ्या टेचात पप्पांना चुटकी वाजवून दाखवावी म्हणून त्यांच्याकडे गेला. "पप्पा ह्यं...बग...चुक्की.."म्हणत अंगठा दोन बोटांवर घासून हलकासा 'फिस्स्' आवाज केला.
पप्पाने पुन्हा-पुन्हा कान लावून ऐकला...तरीही 'फिस्...आणी फुस् च'..!
"अरे ही कसली चुटकी ही तर फुस्सकी.!." पप्पाच्या बोलण्यावर त्यांच्या सोबत तोही खदाखदा हसला. असं कोणी त्याच्यावर हसलं.., की मी नक्कीच काहीतरी भारी केलं असणार., वाटून तोही आपला खळखळून हसून घेतो.....निव्वळ निरागसता!

असाच एकदा शिट्टी वाजवायचा क्लास झाला घरी, पप्पांसोबतच. दोन्ही हातांची बट्टी वाली बोटं तोंडात ठेवून येणारी चिंचोळी शिट्टी..!
पप्पा पेक्षाही भारीच जमली त्याला. पण ती ओठांतून जन्माला आलेली नसून कंठातून निघतेय हे कळायला थोडा वेळ जावा लागला. घशातूनच चिंचोका आवाज काढत होता तो., पण अगदी हुबेहूब शिट्टीच.

हल्लीच अजून एक आवाज शिकलाय. आमच्या गॅलरीत एक साधी प्लास्टिक खुर्ची आहे. कधीतरी हवेशीर बसता येईल म्हणून ठेवलेली. तशी ती मोकळीच. तिथली जमीन जरा उबड-खाबड विनाफरशीची. हा आपला ऊठसूट ती खुर्ची ह्या टोकातून त्या टोकाला फरफटत नेतो. रर्र$$$$$$...नुसतं कर्णकर्कश्श्..! मेंदू सकट सगळंच व्हायब्रेशन मोडवर पोचतं...आता आठवण काढली तरी पिंजलेल्या केसाची मीच दिसले मला. रोजच दोन-चारदा हा खुर्ची प्रकार ठरलेला. मग मी, लाटणं-उलथणं नी राग घेऊन पळत सुटते घरभर. त्यालातर मज्जाच, पकडापकडीची.

प्रसंगाअंती हात दाखवून " ये आई थांबा...थांबा...जडा थांबा.....अं$$$$..(विचार करून) आई आय लोव्ह यु.." म्हटलं नी उसणं स्माईल, किलकिले डोळे करून (हे असं😊) आईकडे बघितलं की झालंच काम फत्ते...जरा ढिल मिळायचा अवकाश कि स्वारी परत गेलीच खुर्चीशी पिंगा घालायला...
✍️@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬