#A_dream_of_corona #माझ्या_स्वप्नातली_कोरोना

#A_dream_of_corona
#माझ्या_स्वप्नातली_कोरोना





ही स्वप्नात आली होती काल रात्री....कोरोना कीटकीन म्हणून. स्वप्न दोन पार्ट मध्ये पडलं तसंच लिहिते.

1st part

 माझ्या स्वप्नात आलेल्या टिव्हीत बातम्या चालू होत्या. नुकत्याच कळलेल्या धक्कादायक बातमी ... कोरोना हा विषाणू नसून. ती एक स्री-कीटक असल्याचे समजले. जिचं डिझाईन ते गोल-गोल काटेरी चेंडू सारखं नसून आता असं ह्या काटेरी की केसाळ किडीसारखं दाखवलं जात होतं. *(कालच समोरच्या झाडावर पाहिली म्हणून दिसली असेल स्वप्नात)*.

ही कीटकीन जिथे जिथे जाईल तिथे तिथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. त्यामुळे तुम्हाला आजुबाजुला कुठेही ही दिसली तर लगेच फोन करून अमुक नंबरवर कळवा असे सांगितले जात होते. आत्तापर्यंत जो विषाणू होता तो अचानक कीटकीन असल्याचे कळल्यावर सगळ्या चँनेलवर ह्याच बातम्या.

व्हॉट्सऍप वर मँसेजस फिरत होते.
एका ग्रुपवर चाल्लेलं संभाषण..

मेंबर A: "खरंय मित्रांनो पुराणकाळात महाभारत घडण्यासाठीही एक स्त्रीच कारणीभूत ठरते. आता ही महामारी घडवून आणण्यासाठी ही एक स्री कीटकच जन्माला आलीय. अख्खं जग गिळल्याशिवाय काय ही शांत होत नाय.."😣
*(काल ईथे महाभारताची एक पोस्ट वाचनात आलेली तेही उतरलं बहुतेक स्वप्नात)*

एकाचं म्हण्ण् पडलं..."मुळातच बायका चिडखोर असतात. वड्याचं तेल वांग्यावर काढतात आणी भांडी कित्ती 😣तेलकट करुन ठेवतात. साबणाने कितीदा धुतली तरी चिकटपणा जातच नाहीये.🤔 *(हे त्या फेबुवरल्या भांड्यांच्या पोस्टींचे प्रताप स्वप्नातही उमटले)*

दुसरा म्हणे : "अरे आला राग की दिली लावून आग..! असं वागणारी ही मुळात स्री नव्हेच....जगभर ईतका थयथयाट करणारी ही कीटकीन तर कलंकच आहे स्रीजातीवर....

ग्रुपची स्त्री-मेंबर : तुम्हा पुरुषांना मुळी सवयच झालीये., प्रत्येक चुकीचं खापर स्त्रियांवर फोडण्याची... जरा कुठे त्या विषाणू-किटाणू चं जेंडर काय कळलं... तर उठले लगेच  तलवारी घेऊन लढायला....स्त्री आहे म्हणून तुम्ही सगळे आहात कळलं..??😡 अरे जेंडरवरुन भांडण्यापेक्षा तिचा सामना कसा करायचा ते बघा. नको तिथे शक्ती वाया घालवतायत नॉनसेन्स लोक. *(कुठल्या तरी फेसबुक पोस्टीचीच देण असावी हीपण)*

मग मधेच दिसलं मी मोबाईल बाजूला ठेवत होते. तोच निसटून खाली पडेल म्हणून झेलायला गेले आणी जाग आली..😴🙄
 (*खरंतर हातात मोबाईल नव्हताच.... जाग मला गंप्याने मारलेल्या लाथेमुळे आली होती. असो मी गंप्याचं ढुंगण आणी पाय एका रेषेत लावून पुन्हा झोपले..*)

2nd part
रात्री चे दोन-अडीच वाजलेले असताना ही कीटकीन शहरातल्या मोकळ्या रस्त्यावर सर्रssss.सर्रsss. आवाज करत सरपटतेय.  एक अख्खा माणूस गिळेल ईतकी मोठी अजगर झालेली दिसतेय मला ती. तिच्या एका नांगीतून तीने रस्त्यापलीकडल्या एका बिंल्डिगवर विषाचा की विषाणू चा फुस्कारा मारला आणी "कित्ती गं बाई मी हुश्शार.! टाईपचं घाणेरडं हसु आणत.,आमच्या शहरातील एन्ट्री ब्रिजवरुन पूढे पुढे सरकू लागली.

थोड्याच वेळात म्हणजे साडेतीन-चारला *(ते मेलं घड्याळ मधेच सारखं-सारखं का दिसत होतं कोणासठाऊक.,)* ती आमच्या बिल्डिंग खालच्या रस्त्यावर पोहोचली. फारच हळूहळू चालत असावी. सगळीकडे शुकशुकाट..! शेजारच्या बिल्डिंगीं वर मगाससारखाच विषाणू-फुस्कारा मारुन पुढे सरकली. आमच्या बिल्डिंग चा तुडतुडा वॉचमन दिसला तिला. तिला बघून आतल्या आवारात पळत सुटला तो. *(आपला जुना वॉचमन चांगला होता...त्याला काढून हा तुडतुडा पोरगा का ठेवला यावर काल आमच्यात सहजच चर्चा झाली होती)*  आता ती आमच्या बिल्डिंग वरही फुस्कारणार तितक्यात मागून अग्निशमन दलाची गाडी येताना दिसली. समोरून पोलिसांनी एक सँनिटायझर व्हँन आणली. घाबरून ती वाकड्या-तिकड्या ढेंगा टाकत पळणार तोच तिच्यावर सँनिटायझरचा वर्षाव सुरु झाला.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तिच्या वर सँनिटायझर मारलं जात होतं त्यामुळे ती बिल्डिंग च्या आत येण्याची शक्यता वाढली... आत्तापर्यंत अख्खी सोसायटी जागी झाली होती. तिला बघून सगळेजण आपापल्या खिडक्या-ग्यालरीत जमले होतो. हातात बादली होती., डेटॉल आणी वॉशींग पावडर-मिश्रित पाणी घेऊन तयार होतो आम्ही.*(स्वप्नात ही सोशल डिस्टंसिंग पाळत होतो)* वरुन सगळ्यांनी धपाधप् बादल्या ओतल्या तिच्या अंगावर. तिकडून
फवारणी सुरुच होती. आता तिची शक्ती कमी झाली होती. ती आकाराने ही लहान लहान होत चालली. अगदी नॉर्मल किडीचा आकार घेऊन मग मरण पावली. तिचा मृतदेह नेण्यासाठी मी आमच्या कडची कापराची रिकामी डबी खिडकीतून खाली कर्मचार्यांकडे फेकली., त्यात एक काडीपेटीतली काडी ही टाकली होती...*(घरातील ग्यास-लाईटर बंद पडलाय आणी  काडीपेटी ही संपतेय ती आणायला हवी असं कालच म्हणालेले ह्यांना)*. कर्मचाऱ्यांनी तिला काडीने अलगद उचलून त्या डबीत टाकली आणी त्यात सँनिटायझर भरून ती बंद केली.

"अरे कोरोना मेली रेssss...!" ची आरोळी ऐकू आली आणी सगळ्यानी एकच गलका केला..."वुई वॉन.... कोरोना गॉन.....वुई वॉन.... कोरोना गॉन..!!"
सगळीकडे एकच जल्लोष आणी सगळ्या वॉरिअर्स चे आभार म्हणून अख्ख्या जगभर सगळ्यांनी टाळी-थाळी-घंटानाद सुरु केला. मंदिरांत शंख फुंकले गेले. फटाके, ढोल,ताशे,दिव्यांची रोशणाई करत उत्सव साजरा झाला. पण सगळे पुरुष बनियन-बरमुडा आणी स्त्रिया नाईटगाऊनवरच नाचताना का दिसतायत., या विचारात असतानाच माझ्या कानाजवळचा घंटानाद काही केल्या बंद होईना म्हणून डोळे चोळत उठले. पाहिले तर फोनवर साडे-पाचचा गजर सुरु होता.

✍️@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬