कोरोना सुट्टीतलं विशेष वाळवण

Feeling लॉकडाऊन झटके🙄

#जिभेचे_चोचले_कित्ती_कित्ती_कित्ती_ते_पुरवावे


कोरोना सुट्टीतलं विशेष वाळवण.....

साहित्य: भाजीवाल्याकडे मिळेल तो भाजीपाला, घरचंच मीठ, पाणी ....

कृती: भाजीपाला जो मिळेल तो घेऊन आलात की आधी ती पिशवी योग्य त्या ठिकाणी ठेवून प्रथम हात स्वच्छ साबणाने धुवून घ्या.(हि स्टेप फारफार महत्वाची आहे.)

भाज्या मोठाल्या पराती,टोपांमध्ये काढून घ्या. त्यात पाणी भरून भाजी ला यथेच्छ स्विमिंग करुद्या. हात पुन्हा एकदा धुवून या.(अर्थातच तुम्ही आता सवयीचे गुलाम झालेले आहात)

 पळीभर,पसाभर,मुठभर असं जे काही अव्हेलेबल असेल ते प्रमाण घेऊन मीठ सगळ्यां भाज्यांना पुरेल असे प्रत्येक भांड्यात टाकत सुटा..आता त्या भाज्याना समूद्रात स्विमिंग करत असल्याचं फिल येऊद्या. जिवाची मज्जा मज्जा करु द्या जरा त्यांनाही..

दहा मिनिटांनी त्या मिठाळ पाण्यातून भाज्या निथळून काढा. आता फक्त आणखी एकदा., साध्या पाण्यात त्यांना डुबकी मारायची संधी द्या.... मग पहा कसं रुप खुलुन येईल त्यांचं..

 आता म्हणा त्यांना "झाला नं शंभो करून.??, चला निघा बरं बाहेर....नाहीतर सर्दी होईल" आणी मोकळ्या पराती, टोपल्यांमध्ये त्यांना सुटसुटीत मांडून पंख्याखाली सुकुनची हवा खाऊद्यात. एखादीला सनबाथ घ्यावासा वाटला तर घेऊद्या. त्या सगळ्या रंगीत भाजीच्या टोपल्या-परातीत शांत पहुडलेल्या भाज्या बघत असताना हळूच चैनीची नींद येईल तुम्हाला.
जा एक झोप काढून या. आपल्याकडे तसाही भरपूर रिकामटेकडा वेळ आहे.,तो सत्कारणी लावा. तोवर भाज्यांचं वाळवण तयार होतच आहे...

तुमचा डुलका झाला की सगळ्या भाज्या अदबीने उचलून ठेवा फ्रिजमध्ये. बाहेर गरमीनेही त्यांचा जीव नको जायला...

आता फार लाड नकोत.. सगळ्या भाज्या नीट शिजवून खा..स्वस्थ रहा..घरी रहा...

🙏@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬