#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे....
#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे....
दरवेळी गावाकडून येताना फुलझाडं, बिया वगैरे आणते. कालपण गुलाबाची फांदी घ्यायला विसरेन म्हणून सकाळीच उजडत हातात विळा घेऊन काकीच्या परड्यात गेले. गुलाबासोबत मोगरापण घेतला छाटून. गुलाबाने हाताला खरचटलं. भाऊ मला वेडी म्हणाला. "मुंबईत मिळत नाहीत का गुलाबाची झाडं ? एवढा आटापिटा करुन ईथून नेतेय" म्हटला.
ईथल्या गुलाबाला तो गावठी गुलाबाचा सुगंध येईना म्हणून तिकडूनच फांदी आणून लावायचा माझा हट्ट. मैत्रीण तर म्हणे "खोटी फुलं आणायची सजावट करायला., ती सुकतसुद्धा नाहीत., कशाला ईतकी मेहनत घेतेस..?"
मला कसंसंच वाटतं ते. छान हिरवागार जरीकाठ शालू नेसणारीला हिरव्या पॉलिस्टरमध्ये गुंडाळल्यासारखं. छ्या्.! नुसतीच बनावटी शोभा. आई म्हणायची "घराभोवती चार फुलझाडं असलीत की घरातल्या हवेचा, वातावरणाचा पोत सुधारतो." पटतं मला ते.
अहोंनी लग्नानंतर फिरायला कुठे जायचं विचारलं तेव्हा ही मी जिथे मस्त हिरवागार परिसर, शुद्ध मोकळी हवा असेल तिकडे न्या म्हटलं. तेव्हाही केरळ डोळ्यांत साठवून घेतलं. गावी आल्यावर सुद्धा तेच करते. वर्षभरासाठी ती हिरवळ, स्वच्छ नितळ वातावरण साठवून घेते मनात. परत असतंच ईकडलं प्रदूषण. त्यातल्या त्यात घरात असताना तरी सकाळी उठल्यावर ग्यालरीत ही कुंडीतली वृक्षावळ पाहून तेवढंच जरा प्रसन्न वाटतं. चार फुलं देवासाठी स्वकष्टाने फुलवलेली मिळाली तरी समाधान मिळतं.
फुलां,झाडांसाठीचा हा वेडेपणा मला आईकडून आंदण मिळाला बहुतेक. तीसुद्धा रमायची तिच्या कुंडीतल्या बाळांमध्ये. मांजरीने कुंडी पाडली आणी तुळस, फुलझाड सुकून गेलं तर कळवळायची ती. मलाही सुकलेलं कुंडीतलं झाड पाहिलं की त्याला डॉक्टरकडे नेऊ की काय वाटायला लागतं. तेच एखादं फुल उमललं की त्याला कुठे ठेऊ नी कोणाकोणाला सांगू असं होतं. आजही मोगरा टपोऱ्या कळ्यांनी भरलाय. मला तर वाटलेले मी तिकडे गावी तर ईकडे सगळ्या कुंड्या ओस पडतील. शेजारणीने दोन दिवस घातलेलं पाणी पण नंतर तीही तिच्या गावी. ईकडे झाडांना पाणी नाही तर ती जगणार नाहीतच. पण माझ्या झाडांनी माझ्यासाठी तग धरलेला. पार मेटाकुटीला आलीत पण मी पाणी घातलं तशी एका तासात तरतरीत. माझ्याही जिवात जिव आला.
असो असतं एकेकाचं वेड..!😊
@$m!

Comments
Post a Comment