Posts

Showing posts from 2018

#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे....

#वृक्ष_वल्ली_आम्हा_सोयरे.... दरवेळी गावाकडून येताना फुलझाडं, बिया वगैरे आणते. कालपण गुलाबाची फांदी घ्यायला विसरेन म्हणून सकाळीच  उजडत हातात विळा घेऊन काकीच्या परड्यात गेले. गुलाबासोबत मोगरापण घेतला छाटून. गुलाबाने हाताला खरचटलं. भाऊ मला वेडी म्हणाला. "मुंबईत मिळत नाहीत का गुलाबाची झाडं ? एवढा आटापिटा करुन ईथून नेतेय" म्हटला. ईथल्या गुलाबाला तो गावठी गुलाबाचा सुगंध येईना म्हणून तिकडूनच फांदी आणून लावायचा माझा हट्ट. मैत्रीण तर म्हणे "खोटी फुलं आणायची सजावट करायला., ती सुकतसुद्धा नाहीत., कशाला ईतकी मेहनत घेतेस..?"  मला कसंसंच वाटतं ते. छान हिरवागार जरीकाठ शालू नेसणारीला हिरव्या पॉलिस्टरमध्ये गुंडाळल्यासारखं. छ्या्.! नुसतीच बनावटी शोभा. आई म्हणायची "घराभोवती चार फुलझाडं असलीत की घरातल्या हवेचा, वातावरणाचा पोत सुधारतो." पटतं मला ते. अहोंनी लग्नानंतर फिरायला कुठे जायचं विचारलं तेव्हा ही मी जिथे मस्त हिरवागार परिसर, शुद्ध मोकळी हवा असेल तिकडे न्या म्हटलं. तेव्हाही केरळ डोळ्यांत साठवून घेतलं. गावी आल्यावर सुद्धा तेच करते. वर्षभरासाठी ती हिरवळ, स्वच्छ नितळ व

Asmi Shinde💁: नावात काय आहे...??

Asmi Shinde💁: नावात काय आहे...?? खूप साऱ्या आठवणी...??? लहानपणापासून आत्तापर्यंत खूप नावांनी मला हाक मारणारी वेगवेगळी लोकं माझ्या आयुष्यात आलीत...सर्वांत पहिलं नाव जे आई-पप्पांनी दिलं.....'प्रमोदिनी'.! हे फार कोणाला नाही माहित पण माझं सर्वात पहिलं नाव हेच. अर्थात मलाही खूप वर्षांनी कळलं. कारण तोवर फक्त 'रुपाली'याच नावाने मी स्वतःला ओळखत होते. आईने सांगितलं प्रमोदिनीचं टोपणनाव 'पमे','पमा' झालं असतं म्हणून तिने माझं नाव बदलून रुपाली असं ठेवलं. माझी बहिण दिपाली आणी मी रुपाली. असं काहिसं ते ठरलं. मग पुढे त्याचं टोपण 'रुपा' झालं. ठिकेय..! पमे पेक्षा बरंच वाटतं ते. पुढे शाळेतल्या चिडवा-चिडवीत रुपाचं 'पारु'...रुपाली चं 'पाली' 'लीपारु' वगैरे वगैरे झालं. आणी मला माझ्या नावाचा राग यायला लागला. एकदा गावी कोणीतरी मला विचारले "तू मंबयीच्या नंदूनानांची रुपी ना गं..??"🙄. आणी मला माझ्या नावाच्या आणखी एका रुपाचा साक्षात्कार झाला. तेव्हा "पारु गं पारु...." गाणं दर गणपतीत स्पीकरवर लावलं जायचं. आणी मी अजिबात न ऐ

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

#जागतिक_महिला_दिनानिमित्त #माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री... "माझी आई" आजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं क