Posts

Showing posts from 2019

#गंपू_मिंमा

Image
#गंपू_मिंमा मिंमा हॉलमध्ये भाजी निवडण्यात गुंग... गंपू तिथेच सोफ्यावर खेळण्याच्या ढिगाऱ्यात व्यस्त... टीव्हीवर एका चँनलवर घोडदौडीचा कार्यक्रम... तो पाहून अचानक ढिगाऱ्यातून खाली उतरून मिंमाच्या पाठीवर गप्पकन् स्वार होतो...गळ्यात हात अडकवून... गंपू: मिंमा... मिंमा... मी : हा बोल काय झालं..?? गंपू: "अडे... खौडा खौडा खौडा खौडा... ढिंप्..टाक्कम् खौडा....." मी: 🙄मी अत्यंत टेन्शन मध्ये "क्काय्...." तू आधी मानगूट सोड माझं...उतर खाली..." तो: दोन मिनिटांनी पुन्हा लांबून पळत येऊन धप्पकन् मिंमाच्या पाठिवरुन खांद्यावर चढून बसतो.... आणी माझे कान पकडून सुरु करतो... "लख्डी खी खौटी....खौटी का खौडा..... थोडा..खौडा.. खौडा...खोडा....ढिंप् टाक्क्म् खौडा..... मिंमा: 🙄😓🤕"खौडा नाही रे घोडा... घोडा....आणी काय..ढिंप् टाक्क्म्........ अरे बाबा तु उतर रे मी नाहीये तुझा खौडा.... उद्या माझी हाडं मोडली तर तुझा टिफिन कोण बनवणार...? तो: अजूनही टॉपफ्ल़ोअरवरुनच...एका हाताने माझी हनुवटी पकडून मान स्वताच्या हिशोबाने वळवून घेऊन ...वरुनच मोठ्ठे डोळे करत.. "

#मी_झाड_असते_तर..??

Image
#मी_झाड_असते_तर..?? कलिंगड खाताना बी गिळली की पोटात झाड उगवतं..... ह्याची भयंकर भीती तेव्हा अनुभवली जेव्हा हा किस्सा घडला... मी शाळेत तिसरी-चौथीला असेन. उन्हाळी सुट्टी सुरु झालेली. पप्पांनी आणलेलं कलिंगड त्या दिवशी दुपारी खाल्लं आणी मी खेळायला मागच्या गल्लीत गेले.  ते खाल्या नंतर संध्याकाळी दोन्ही कानात खूप खाज यायला लागलेली. घसा खवखवत होता. ही खरंतर सर्दी-खोकला होण्याची लक्षणं. पण मैत्रिणीने अचानक विचारलं "तू कलिंगडाची बी गिळलेलीस का...? गिळली असशील तर मेलीसच बघ...तुझ्या पोटात आता कलिंगडाचं झाड उगवणार...कानातून, नाकातून, तोंडातून फांद्या बाहेर येणार."  या डेंजर माहिती वर तिथेच खेळत असलेल्या बाकीच्या तीन-चार जनांनी पण शिक्कामोर्तब केलं. मस्त  घाबरगुंडी उडाली. मला उगाच मी बी गिळलीये असंच वाटायला लागलं. आमच्यातलंच कुणीतरी म्हणालं " अगं जा आईला सांग लवकर, डॉक्टरकडे जा...ते पोट कापून लग्गेच बी काढून टाकतील.." हे ऐकून तर पोटात मोठ्ठा गोळाच आला. आईला सांगितलं तर ती डॉक्टर कडे नेऊन माझं पोट कापायला लावेल. म्हणून तिला सांगणं तर मी तेव्हाच कँसल केलेलं. पण नाही स

चांदणस्पर्श

Image
चांदणस्पर्श..! दिवेलागणीला मागचं दार उघडून ग्यालरीत आले आणी समोरच चंद्र झाडाआड लपलेला दिसला. अगदी शांत, शीतल चांदणं...., अलगद थंड  वाऱ्याची झुळूक आली.., आणी मनात कुठल्याशा गाण्याची शोधाशोध सुरु झाली. पण कुठलं गाणं...??,,, अगदी बराच वेळ आठवेना ते गाणं. असं मुद्दाम काहीतरी आठवायला गेलं कि मेंदू आडग्यासारखा रुसुनच बसतो. घरातून अंगणात येरझाऱ्या घालून सुद्धा गाण्याची एकही ओळ लक्षात येईना. आत्ता हल्लीच तर ऐकलेलं...कितीदा त्यातल्या ओळी गुणगुणत होते...."चांदणं....Ss..अंगणी..Ss" ईतकंच आठवे पण पुढचं, मागचं सपाट.... असं काही माहिती असलेलं ऐनवेळेस आठवेना कि ते आठवेस्तोवर चैन पडत नाही हे मात्र खरं. नेहमीची कामं हातावेगळी करत करत मेंदूच्या आठवण कप्प्यात गाण्याचा शोध सुरु ठेवलेला. कंप्युटर बॅकअप मधे सर्च सुरु ठेवल्यावर कसा तो डिटेक्टिव्ह भिंग (microscope)प्रत्येक कप्प्यातल्या पुस्तकांवर गोल गोल फिरुन शोधून काढतो तसंच काहीतरी  माझ्या मेंदूत सुरु असावं वाटलं. शेवटी आमच्या डोक्यातल्या गुप्तचर सूक्ष्मदर्शकाने ते गाणं शोधलंच. स्वयंपाक घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर आता