#गंपू_मिंमा

#गंपू_मिंमा


मिंमा हॉलमध्ये भाजी निवडण्यात गुंग...
गंपू तिथेच सोफ्यावर खेळण्याच्या ढिगाऱ्यात व्यस्त...
टीव्हीवर एका चँनलवर घोडदौडीचा कार्यक्रम...

तो पाहून अचानक ढिगाऱ्यातून खाली उतरून मिंमाच्या पाठीवर गप्पकन् स्वार होतो...गळ्यात हात अडकवून...

गंपू: मिंमा... मिंमा...
मी : हा बोल काय झालं..??

गंपू: "अडे... खौडा खौडा खौडा खौडा... ढिंप्..टाक्कम् खौडा....."

मी: 🙄मी अत्यंत टेन्शन मध्ये "क्काय्...." तू आधी मानगूट सोड माझं...उतर खाली..."

तो: दोन मिनिटांनी पुन्हा लांबून पळत येऊन धप्पकन् मिंमाच्या पाठिवरुन खांद्यावर चढून बसतो.... आणी माझे कान पकडून सुरु करतो... "लख्डी खी खौटी....खौटी का खौडा..... थोडा..खौडा.. खौडा...खोडा....ढिंप् टाक्क्म् खौडा.....

मिंमा: 🙄😓🤕"खौडा नाही रे घोडा... घोडा....आणी काय..ढिंप् टाक्क्म्........
अरे बाबा तु उतर रे मी नाहीये तुझा खौडा.... उद्या माझी हाडं मोडली तर तुझा टिफिन कोण बनवणार...?

तो: अजूनही टॉपफ्ल़ोअरवरुनच...एका हाताने माझी हनुवटी पकडून मान स्वताच्या हिशोबाने वळवून घेऊन ...वरुनच मोठ्ठे डोळे करत..
"मिंमा.... टिफ्फिन्??ववॉव्व्......यम्मी....टेश्शी.....एकटाच आतून आनंदाच्या उकळ्या फुटल्या सारखे तोंड "

🙄डँबिस्स्....बोलता येत नाही तरी बरोब्बर सुचवतोय उद्याच्या टिफिनमध्ये यम्मी टेस्टी दे...त्याचं यम्मी टेश्शी म्हणजे... काहीतरी गोड, बटरी,चिझी, चॉकलेटी टाईप्स.......
✍️@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी