#गंपूल्या_गोष्टी #यम्मीटेश्टीगंपू

#गंपूल्या_गोष्टी
#यम्मीटेश्टीगंपू

परवा मोबाईल वर एकसे बढकर एक रेसिपीज स्क्रोल करुन बघत होते. गंपू मला चिकटून बसून माझ्या मोबाईलमध्ये डोकावत होता.. मग त्यात केक,आईस्क्रीम,चीझी-बटरी फुड असलं काहीही दिसलं की हा "स्स्सीपप...(असा आवाज काढून) वॉव...यम्मीटेश्टी.." म्हणत मोबाईल मधला तो केक हाताने उचलून तोंडात टाकायचा.

तसंही आमच्या जेरीला बेरी,दूध-तूप,खवा, साखर,आणी जे काही क्रिमी-बटरी, गोडगोड मोडमध्ये येतं ते सगळंच आवडतं.   हा गोड-मोड माझ्याकडचा आलाय त्याच्यात... मी पण अशीच गोडघाशी होते. त्यातल्या त्यात लहानपणी तूप-साखर चपाती हे माझं फेव्हरेट खाद्य. आई म्हणायची तीला बाळ झालेलं (आमचा धाकटा होता त्यावेळी) म्हणून ती माहेरी होती. आज्जी तिला ताटात असंच भरपूर तूप वगैरे घालून वरणभात, तूप-साखर चपाती द्यायची. आणी मला वेगळी प्लेट देऊन बाजूला बसवायची. मी मात्र आईच्या ताटात तूप-साखर जास्तय म्हणून तिच्याच ताटात जेवायचा हट्ट करायची. आजीने मला कितीही तूप वाढलं तरी "तू आईलाच जास्त देतेस" म्हणायचे.

काल गंपू साठी केक केला... साहित्य तोकडं होतं पण त्याच्यासाठी करायचाच म्हणून जुळवाजुळव करून आहे ते जिन्नस वापरून केला.

केक तयार होईस्तोवर हा पाठीवर हात ठेवून किचनमध्ये फेऱ्या घालत होता. मायक्रोवेव्ह ने टिंग-टिंग वाजवून सांगितलं की झाला तुमचा केक तयार तसा हा पळतच आत आला. सगळ्या केकमधला पावभरच बाकीच्यांच्या वाट्याला आला...सगळा ह्याने "अडे माझ्झाय ना.."म्हणत एकट्याने गट्टम केला.

एरव्ही ईकडे मी चहा बनवायला घेतला की ह्याचं सगळं लक्ष साखरेच्या डब्यावर...कधी तो उघडेल आणी साखरेची चिमट माझ्या तोंडात पडेल. देवापुढली साखर पण अशीच.. "वॉव यम्मीटेश्टी.." म्हणत संपते.

कधीतरी म्हणजे रोजच मी गंपूला गुरफटून घेते नी म्हणते "गंपू तू यम्मीटेश्टीये रे... मी तूला थोडाशा खाऊ का..??" तर म्हणे "ह्म्म् अडे क्कायै हे...मी अमूलबटरैय..? अशे शाखरे-शाखरे खातेश?"

✍️@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬