नाचणीचे लाडू

नाचणीचे लाडू..


लांबून एखाद्या आकर्षक चॉकलेट बॉलसारखा दिसणारा हा पौष्टिक नाचणी लाडू खास ऊन्हाळ्यात बनवण्याचं कारण म्हणजे नाचणीतला थंडावा. शिवाय नाचणीतुन शरीराला कँल्शिअम सूद्धा मिळते, भुक नियंत्रणात राहाते. चवीलाही मस्त. एकूणच अतिशय पौष्टिक अशी ही नाचणी लाडवाच्या रुपाने समोर आली की लहान-मोठे सगळेच आवडीने ते फस्त करतात. पोषणमुल्यांनी भरपूर, जिभेचे चोचले पुरवणारे हे लाडू नक्की करुन बघा.

साहित्य: १किलो नाचणी, पिठीसाखर पाव किलो +१छोटी वाटी (अंदाजाने गोड कमी जास्तचं तुमचं प्रमाण), तुप ४०० मिली अंदाजाने कमी जास्त करु शकता), १ वाटी भाजलेला रवा, वेलचीपूड, काजुचे-बदामचे बारीक तुकडे

क्रती: नाचणी भाजून दळुन आणा. दळलेले पिठ तुपात निट भाजून घ्या. मग त्यात पिठीसाखर,रवा, वेलचीपूड,काजुचे तुकडे घालून एकजीव करुन लाडू वळायला घ्या. आवश्यक असल्यास लाडु वळताना तुप कोमट करुन मिश्रणात घाला. तयार लाडु थोडा वेळ मोकळ्या हवेत ताटात सुटसुटीत करुन ठेवा मग डब्यात भरुन ठेवा.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी