माझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली

फोडणीची रवा इडली



१.)*इडली मिश्रण:
२ वाट्या रवा,
१ वाटी दही,
२-३ चमचे तूप,
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,
१ टीस्पून किसलेलं आलं,
२-३चमचे किसलेलं गाजर (ऑप्शनल),
१०-१२ काजुचे मध्यम आकाराचे तुकडे,
मीठ चवीनुसार
चिमूटभर खायचा सोडा

*फोडणीसाठी:
२ चमचे तेल,
१ टीस्पून मोहरी,
१ चमचा चिरलेला कढीपत्ता,
चिमूटभर हिंग,


२.) *चटणी साहित्य:
१वाटी खोवलेला नारळ,
२चमचे चिरलेली कोथिंबीर,
२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
१चमचा डाळे,
२-३पाकळ्या लसूण,
१ टिस्पून किसलेलं आलं,
मीठ चवीपुरतं

*फोडणीसाठी तेल
१टिस्पून मोहरी,
२ चिमूट जिरे,
१ चमचा चिरलेला कढीपत्ता,

कृती : कढईत २चमचे तूप टाकून रवा खरपुस भाजून घ्या. रवा काढून इडली मिश्रणासाठीच्या पातेल्यात काढून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप घालून काजुचे तुकडे तळून घ्या. मग तेही पातेल्यात टाका. एका कढेलीत फोडणी तयार करुन ती या मिश्रणात ओता. आता क्रमाने दही, गाजर,आले,मीठ, मिरची घालून मिसळा गरज असल्यास एकाध चमचा पाणी घाला आणी २० मिनिटे बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत चटणीची तयारी करुन घ्या. चटणी साहित्यात दिलेल्या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरवर फिरवून घ्या, आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट वाटून घ्या. मग एका भांड्यात फोडणी तयार करुन त्यात ही चटणी टाकून अर्ध्या एक मिनिटात गॅस बंद करा.

आता इडली मिश्रणाकडे वळा. मिश्रण व्यवस्थित मुरलेलं असेल एकदा मिश्रणाची कंसिस्टंसी चेक करुन आवश्यक वाटल्यास एक दोन चमचे पाणी घाला. दूसरीकडे इडली भांड पाणी घालून गॅसवर चढवा. आता या इडलीमिश्रणात सोडा घालून चमच्याने हलकेच मिसळून घ्या. इडलीपात्राला डिशला तेल लावून घ्या. तोवर सोड्याचं मिश्रणातलं काम सुरु झालेलं असेल. इडली १०-१२ मिनिटे मिडियम फास्ट गॅसवर वाफवून  चटणी सोबत सर्व्ह करा.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी