Posts

गंपूच्या गोष्टी - गंपूची रंगपंचमी

Image
गंपू (वय - १३ महिने) धुळवडीला शेजारणीने तिच्या मुलाकडे रंगाची पुडी मागितली. त्याने सरळ रंगांच्या पुड्या ठेवलेली एक छोटी बादली तिला आणून दिली. तिने त्या बादलीतला एक रंग चिमूटभर घेतला आणि माझ्या गालाला लावला. मग बाकीच्या शेजारणीपण धावत आल्या. त्यातल्या एकीने एक पुडी बादलीत पालथी केली, त्यात थोडे पाणी मिसळले आणि तो रंगीत चिखल मला लावला. बाकीच्यांनीही परत एकदा चिमूट-चिमूट घेऊन हातभार लावला. आता हा सगळा प्रकार झाला आमच्या चिरंजीवांसमोर; ज्यांना आधी वाटलं की, या सगळ्या काकी मिळून आईला मारतायत. म्हणून हा लागला जोरात किंचाळायला. एकतर मी याला कडेवर घेऊन उभी, त्यात मैत्रिणी रंग लावतायत तो डोळ्यात जाऊ नये म्हणून मी डोळे बंद केलेत आणि हा अगदी माझ्या कानात ओरडतोय. समोर मैत्रिणींचा गलबला, हा का किंचाळतोय, काय लागलं?/चावलं?/टोचलं? “अर्रे थांबा,” जोरात ओरडून सगळ्यांना गप्प केलं आणि युगकडे वळले. त्याचा हा प्रकार माझ्या चांगलाच परिचयाचा झालाय. मैत्रिणीने माझ्या गालाला हात लावला आणि मी डोळे मिटून घेतले म्हणजे मला रडू आलेय, असा अंदाज बांधून तो किंचाळला. एरवीही कोणा दोघांमध्ये चाललेली शाब्...

मी एकदा हरवले तेव्हा...

मी एकदा हरवले तेव्हा... मी तेव्हा लहान, म्हणजे चौथीत असतानाची ही गोष्ट. वार्षिक परिक्षा संपली आणी उन्हाळी सुट्टीला आम्ही सगळे मामाकडे गावी जायला निघालो. आम्ही म्हणजे मी, माझे आई-वडील, माझे  दोन्ही भाऊ आणी माझे मामा. मामा आम्हाला न्यायला मुंबईला आले होते. उंब्रजला जाणाऱ्या एका खाजगी टुर्स च्या बसने आम्ही निघालो. त्यावेळी घाटावर काही अपघात की काय कारणामुळे गाडी बराच वेळ हळूहळू पुढे सरकत होती. ज्यामुळे उंब्रजला पोहोचायलाच आम्हाला जवळ-जवळ दुपार झाली. मला प्रवासात गाडी लागते ., निघताना काही खाल्ले असेल ते घाटातल्या नागमोडी वळणांवर आलो की अक्षरशः ढवळून निघते. गावी पोहोचेपर्यंत पोट रिकामे होईस्तोवर सगळे उलटून होते. त्यादिवशी ही असेच घडले. गाडी एस्.टी.स्टँड पासून थोड्या अंतरावर थांबली. आमची बसमधून खाली उतरायची लगबग सुरु झाली. माझ्यात चालण्याचे अजिबात त्राण उरले नव्हते. कोणी उचलुन घरापर्यंत नेले तर बरे होईल असेच वाटत होते. पण कोण घेणार..?? मामा आणी पप्पांकडे कपड्यांच्या बँगा,आईच्या कडेवर आमचं धाकटं शेंडेफळ आणी दोन नंबर भावाने तिचा हात धरलेला. मी गुपचुप आईचा पदर धरुन तिच्या मागून चालत...

साला एक मच्छर

साला एक मच्छर!!!,🐝🐝🐝 सकाळी सकाळी छान कोवळं ऊन खिडकीतुन स्वयंपाकघरात डोकावत असतं. गँसवर मस्त आल्याचा चहा तयार झालेला असतो. समोरच ओट्यावर चहाचा कप त्यावर गाळणी ठेऊन तुम्ही चहा ओतायच्या तयारीत असता. इतक्यात एक मच्छर, रात्रभर गुडनाईट पिऊन आलेल्या गुंगीतच इकडून तिकडून डुलत येतो. त्याच आलं- घातलेल्या चहाचा वाफारा घेऊन नशा घालवावी म्हणुन ओट्यावर घुटमळायला लागतो. तुमच्या एका हातात गाळणी आणी एका हातात चहापात्र असल्यामुळे तुम्ही त्याला तोंडचलाखीनेच फूss..फूsss...करुन लांब पळवता. अर्धा चहा ओतेस्तोवर तो तुम्हाला वळसा घालुन परत येतो. तुम्ही पुन्हा त्याला तुमची भाषा समजतेच या अपक्षेने "एss.... हुssड, शूक्....शूक्, अर्रेे याssर........ जाsssना..." करत चहा गाळायचं काम अर्धवट टाकून त्याला तिथुन पळवायच्या मागे लागता. तोही तुमच्या सोबत एक-दोन सेकंद पकडापकडी खेळून झाली की येऊन चहाच्या गाळण्यावर बसतो. त्याला फटकावायच्या हिशोबाने तुम्ही एक जोरदार रट्टा त्या गाळण्याला मारता....,कपातला चहा कपासकट कलंडतो आणी गाळण्यातल्या गरमागरम चहापुडीचा लपका तुमच्या तोंडावर (ठप्पाक)येऊन बसतो. गडबडीने ती...

गंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे

ईशारों-ईशारों मे युग'गंपू' वय-१५महिने ती(ईशाऱ्याने): सोना ये ना रे ईकडे..थोडीशी पावडर (पावडरचा डब्बा दाखवत) लावू दे.... तो :(नकारार्थी मान डोलवत)नाही ती: (परत ईशाऱ्यातच तोंडावर विनंतीचे भाव आणत..काजळाची डब्बी दाखवत) "बरं राजा ..काजळाचा टिक्का तरी लावूया.." तो: चेहऱ्यावर लब्बाड हसू आणत...मानेनेच परत "मी नाही ज्जा" ती : खोटं-खोटं रागवून.करंगळी त्याच्या पुढ्यात नाचवत "जा मग कट्टी तुझ्याशी." Sssss Sssss Sssss आssssssssssई 😣😣😣😣 गंप्या्sssss काय केलंस हे..????? 😣😣😣😣 तो: टाळ्या वाजवत "हँ....ही..ही...ही. ती: (करंगळीवर त्याच्या दातांचे उमटलेले ठसे त्रयस्तपणे बघत)  त्याला रागाने "माझी करंगळी काय तुला लॉलीपॉप वाटली काय रे..??? तो: मंकी फेस करुन "यो...दुग्गु..डुग्गु.." 😢 इती: आगाऊगंपूची बिचारीआई

भाकरी - स्वयंपाक घरात गवसलेले सुख

Image
भाकरी स्वयंपाक घरात गवसलेले सुख-भाकरी परातीत (बाजरी/ज्वारी/नाचणीच्या )पिठाचा डोंगर घालायचा मग हातानेच त्यात मध्यभागी एक खड्डा करायचा. त्या खड्ड्यात थोडे warm (lukewarm n hot च्या मधले) पाणी घालायचे मग हळू हळू खड्ड्याच्या चहो बाजूनी असलेल्या पिठाच्या डोंगराला त्या खड्ड्यात ढकलायचं (पाडायचं). आधी हलक्या हातानेच मिक्स करायचं नंतर हात थंड पाण्यात बुडवुन (हात भाजू नयेत म्हणून) पिठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता ह्या मळलेल्या पिठावर आपलंच राज्य असतं एक एक गोळा परातीत घेऊन त्याच्या पाठीवर जोरजोरात (पण हलकेच) धपाटे घालत स्वताःभोवतीच प्रदक्षिणा घालायला लावायची अगदी त्या गोळ्याची figure maintain होईस्तोवर थापायचं. आता ह्या भाकरीला आधी तव्यात पाण्याचा हात लावून नी मग ग्यासच्या मध्यम आचेवंर वा चुलीच्या निखाऱ्याच्या धगीवर नीट भाजले की झाली भाकरी तयार. चेहऱ्यावर एकही डाग नको म्हणून भाकरीला Fair & lovely लावल्यासारखे पांढरे फटक (नाचणीची असल्यास फिरंगी लाल) बाहेर काढू नका. त्यावर आलेले छोटे छोटे ठिपके ब्युटीस्पॉट समजा तिचे. अशाप्रकारे मस्त गरमागरम खरपुस पापुद्रा असलेली किंचितशी सुटलेल्...

आईची रेसिपी - गुलगुलं

Image
#गुलगुलं नुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ. शाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.  गव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.  लहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा. बनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते. @$m!

नाचणीचे लाडू

Image
नाचणीचे लाडू.. लांबून एखाद्या आकर्षक चॉकलेट बॉलसारखा दिसणारा हा पौष्टिक नाचणी लाडू खास ऊन्हाळ्यात बनवण्याचं कारण म्हणजे नाचणीतला थंडावा. शिवाय नाचणीतुन शरीराला कँल्शिअम सूद्धा मिळते, भुक नियंत्रणात राहाते. चवीलाही मस्त. एकूणच अतिशय पौष्टिक अशी ही नाचणी लाडवाच्या रुपाने समोर आली की लहान-मोठे सगळेच आवडीने ते फस्त करतात. पोषणमुल्यांनी भरपूर, जिभेचे चोचले पुरवणारे हे लाडू नक्की करुन बघा. साहित्य: १किलो नाचणी, पिठीसाखर पाव किलो +१छोटी वाटी (अंदाजाने गोड कमी जास्तचं तुमचं प्रमाण), तुप ४०० मिली अंदाजाने कमी जास्त करु शकता), १ वाटी भाजलेला रवा, वेलचीपूड, काजुचे-बदामचे बारीक तुकडे क्रती: नाचणी भाजून दळुन आणा. दळलेले पिठ तुपात निट भाजून घ्या. मग त्यात पिठीसाखर,रवा, वेलचीपूड,काजुचे तुकडे घालून एकजीव करुन लाडू वळायला घ्या. आवश्यक असल्यास लाडु वळताना तुप कोमट करुन मिश्रणात घाला. तयार लाडु थोडा वेळ मोकळ्या हवेत ताटात सुटसुटीत करुन ठेवा मग डब्यात भरुन ठेवा. @$m!