माझी खवय्येगिरी - कढी-पकोडे

आमचा आजचा उपद्व्याप.....कढी-पकोडे -  रात्रीच्या जेवणात....सहजच...... नेहमीच्या भाजी-पोळी, वरणभाताला आज सुट्टी🙌



#कढी_पकोडे_रेसिपी

१ वाटी घट्ट पण आंबट दही, १ वाटी खोवलेला ओला नारळ, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा ईंच आलं, ३-४लसूण पाकळ्या, २चमचे कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरवर बारीक फिरवून घ्या. वाटलेलं मिश्रण कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळदीच्या फोडणीत ओतलं. कि चमच्याने ढवळून त्यात १ ग्लास पाणी ओतावे. या कढीत पकोडे मुरवायचेत आणखी पातळ हवे असेल तर १वाटी पाणी वाढवा. पकोडे करणार नसाल तर कढी तुम्हाला हवी तितकीच पातळ करा. कारण कढीचा आंबटपणा जाता कामा नये.

 पकोडे :  एक वाटी मूग डाळ चार तास भिजवून मिक्सरवर  भरडताना त्यात चार मिरच्या, जिरे, आल्याचा छोटासा तुकडा घालून फिरवा. मग त्या पिठात थोडी कोथिंबीर, चिमुठभर मिरपूड, किंचित सोडा घालून भजी तळून काढा. ती गरमागरम असतानाच कढीत टाका म्हणजे छान मुरतील. अर्धीच भजी कढीत टाका बाकीची तोंडी लावायला राहूद्यात. पंधरा मिनिटांनी कढी-पकोडे भात किंवा भाकरी/पोळीसोबत सर्व्ह करा.

टीप १ : ईथे अगदीच वेळ नसेल तर आपली रेग्युलर कांदा-भजी करून कढीत टाकून खायलाही छान लागतात.

टीप २ : कढीचा आंबटपणा वाढविण्यासाठी एखाद-दुसरं आमसुल घालायला हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी