#गंपूल्या_गोष्टी #स्वरमयी_गंपू
#गंपूल्या_गोष्टी #स्वरमयी_गंपू कोमल हातांच्या हलक्याफुलक्या टाळ्या., कानात गुदगुल्या करणारी पुसटशी चुटकी नी तोंडातल्या तोंडात केलेलं "शू$$क्...शू$$क.... आणी ईतकं सगळं करुनही गॅलरीतून ते पिजन-पिजनी उडेनात म्हणून पसरलेलं भोकाड😭😭 याला विनोदाभास म्हणावं की विरोधाभास...?😅 त्यादिवशी युग मोठ्या टेचात पप्पांना चुटकी वाजवून दाखवावी म्हणून त्यांच्याकडे गेला. "पप्पा ह्यं...बग...चुक्की.."म्हणत अंगठा दोन बोटांवर घासून हलकासा 'फिस्स्' आवाज केला. पप्पाने पुन्हा-पुन्हा कान लावून ऐकला...तरीही 'फिस्...आणी फुस् च'..! "अरे ही कसली चुटकी ही तर फुस्सकी.!." पप्पाच्या बोलण्यावर त्यांच्या सोबत तोही खदाखदा हसला. असं कोणी त्याच्यावर हसलं.., की मी नक्कीच काहीतरी भारी केलं असणार., वाटून तोही आपला खळखळून हसून घेतो.....निव्वळ निरागसत...